'वादळवाट' ते 'The Kashmir Files'... चिन्मय मांडलेकरचा कलाप्रवास 

सध्या सर्वत्र 'द कश्मीर फाइल्स'ची चर्चा आहे. सिनेमाच्या सगळ्या टीमचं कौतुक होत आहे. बिट्टा कराटे हा निगेटिव्ह रोल करणाऱ्या चिन्मय मांडलेकरचाही त्याला अपवाद नाही.

एक प्रतिभावान अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणून चिन्मयची ओळख आहेच; मात्र 'द काश्मीर फाइल्स'मुळे त्याची ही ओळख अधिक दृढ झाली आहे.

मराठी सीरियल्स, नाटकं, सिनेमा आणि वेबसीरिज अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये कथा-पटकथा लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा वैविध्यपूर्ण भूमिका तो लीलया हाताळतो.

1979 मध्ये जन्मलेल्या चिन्मयला मुंबईच्या डहाणूकर कॉलेजमध्ये असताना एकांकिकांमुळे या क्षेत्राची गोडी लागली. नंतर त्याने NSDमधून शिक्षण घेतलं.

'वादळवाट' सीरियलचा सहायक लेखक म्हणून त्याला संधी मिळाली. ती सीरियल खूप गाजली. त्यात त्याने 'शेरा' ही भूमिकाही केली होती.

'असंभव' या मालिकेचं लेखन त्याने केलं. तीही मालिका लोकप्रिय झाली. 'तू तिथे मी' सीरियलचं लेखन त्याने केलं होतं आणि त्यात भूमिकाही केली होती.

एका लग्नाची दुसरी गोष्ट, जीव झाला येडापिसा, चंद्र आहे साक्षीला, राजा-राणीची गं जोडी या सीरियल्सचं लेखन चिन्मयने केलं आहे

'तू माझा सांगाती'मध्ये त्याने केलेल्या संत तुकारामांच्या भूमिकेचं खास कौतुक झालं. 'संत ज्ञानेश्वर माऊली'सारख्या काही मालिकांची निर्मितीही चिन्मयने केली.

'फर्जंद,' 'फत्तेशिकस्त' आणि अलीकडेच रिलीज झालेला 'पावनखिंड' या सिनेमांमध्ये चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उत्तम रीतीने वठवली.

क्षण, कच्चा लिंबू, हिरकणी या सिनेमांचं लेखन चिन्मयने केलं. 'कच्चा लिंबू'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'चंद्रमुखी' हा त्याने लिहिलेला सिनेमा लवकरच रिलीज होईल.

'आदिपश्य'सारख्या काही नाटकांचं दिग्दर्शन त्याने केलं होतं. मग्न तळ्याकाठी, समुद्र आदी नाटकांत त्याने भूमिकाही केल्या होत्या.

झेंडा, मोरया, क्रांतिवीर राजगुरू, गजर, तिचा उंबरठा, लोकमान्य : एक युगपुरुष या मराठी सिनेमांसह 'तेरे बिन लादेन' या हिंदी सिनेमातही त्याने अभिनय केला.

चिन्मयच्या पत्नीचं नाव नेहा असं असून, त्याला जहांगीर आणि इरा अशी दोन मुलं आहेत.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?