मृत्यूनंतर 'या' स्टार्सचे सिनेमे झाले रिलीज

बाॅलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत, ज्यांचे सिनेमे त्यांच्या मृत्यूनंतर रिलीज करण्यात आले. 

त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना तितकंच प्रेम प्रेक्षकांकडून मिळाले. 

90 च्या दशकात अभिनेत्री मीना कुमारी यांच्या मृत्यूनंतर 'गोमती के किनारे' हा सिनेमा रिलीज झाला होता. 

अभिनेत्री दिव्या भारती यांचा कमी वयात मृत्यू झाला. डझनभर सिनेमांचा भाग त्या होत्या. त्यांच्यानंतर हे सिनेमे दुसऱ्या अभिनेत्रींना घेऊन पूर्ण करण्यात आली.

80 च्या दशकात अनेक चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर 'गलियों के बादशहा' रिलीज झाला. 

2018 मध्ये अभिनेत्री श्रीदेवींचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर 11 महिन्यांनी 'जिरो' हा सिनेमा रिलीज झाला. 

सुशांत सिंह राजपूतचा 2020 मध्ये मृत्यू झाला. त्यांच्यानंतर 'दिल बेचारा' हा सिनेमा रिलीज करण्यात आला. 

प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी 'शर्माजी नमकीन' हा सिनेमा रिलीज झाला. 

अभिनेते राजीव कपूर यांचा 2021 रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर 2022 रोजी 'तुलसीदास जुनियर' हा सिनेमा रिलीज झाला.