अभिनेते अक्किनेनी नागार्जुनचं नाव देखील लोकप्रिय अभिनेत्री तब्बूसोबत जोडलं गेलं आहे.
अमालासोबत लग्न झालं असताना देखील तब्बूसोबत नागार्जुनचं नाव जोडलं गेलं होतं. या दोघांचं नातं जास्त काळ टिकलं नाही.
डान्स कोरिओग्राफर प्रभुदेवा आणि लेडी सुपरस्टार नयनतारा यांचं नातं तर कुणापासून लपून राहिलेलं नाही.
प्रभुदेवाचं लग्न झालं असताना देखील या दोघाचं रिलेशन होतं.
धनुषचं लग्न रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्यासोबत झालं आहे. पण त्याचं नाव श्रुती हासन हिच्यासोबत जोडलं गेलं होतं.
धनुषच्या बायकोनं देखील ही गोष्ट कधीच बाहेर येऊ दिली नाही.
कमल हासन यांनी दोन लग्नं केली आहेत. त्यांची दुसरी पत्नी सारिका हिच्यासोबत ते 16 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते.
सारिकासोबत असतानाही या अभिनेत्याचे नाव अभिनेत्री गौतमीसोबत जोडले गेले होते. मात्र दोघांचं नातं फार काळ टिकू शकले नाही.
अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रीचं नाव गायक कुमार सानूसोबत जोडलं गेलं होतं. कुमार सानू यांचं लग्न रीता भट्टाचार्य यांच्याशी झालं होतं.