'दृश्यम 2' मध्ये झळकतोय मराठमोळा सिद्धार्थ बोडके!

'दृश्यम 2' या चित्रपटातील सगळ्या कलाकारांच्या दमदार अभिनयाचं कौतुक होत आहे.

या चित्रपटातील मराठमोळ्या अभिनेत्याचं चाहत्यांकडून विशेष कौतुक होत आहे.

झी युवा वाहिनी वरील 'तू अशी जवळी राहा' मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ बोडके.

'तू अशी जवळी राहा या मालिकेतून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

सिद्धार्थने 'अनन्या' या नाटकातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

आता या  मराठमोळ्या सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

सिद्धार्थ सध्या नुकताच रिलीज झालेल्या 'दृश्यम 2' मध्ये अजय देवगणसोबत  झळकत आहे. त्याच्या अभिनयाचं सध्या सगळीकडे कौतुक होत आहे.

या चित्रपटात सिद्धार्थने डेव्हिड ही  भूमिका निभावली आहे.

सिद्धार्थ बोडकेने अजय देवगण आणि तब्बू यांसारख्या कलाकारांसोबत काम करायला मिळालं यासाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे.