तुम्हाला माहितेय का भारतातील पहिल्या चित्रपटगृहाचं नाव? 

चित्रपट आणि चित्रपटगृहे दोन्ही विषय लोकांच्या अगदी जिव्हाळ्याचे आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपसून लोक चित्रपट पाहून आपलं मनोरंजन करत आहेत. 

सुरुवातीला टीव्ही नसल्यामुळे लोक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जात असत. 

कधी आपल्या कुटुंबासोबत तर कधी खास व्यक्तीसोबत चित्रपटांचा आनंद घेत असतात. 

परंतु अनेकांना प्रश्न पडतो देशातील पहिलं चित्रपटगृह कोणतं असेल?

तर आम्ही तुम्हाला सांगतो, कोलकत्ता येथील 'चॅप्लिन' हे देशातील पाहिलं चित्रपटगृह आहे. 

1907 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या सिनेमागृहाचं नाव आधी  'एल्फिन्स्टन' असं होतं. 

जमशेटजी रामजी मदन यांनी याची स्थापना केली होती. 

आता बनलेल्या चित्रपटगृहांमध्ये प्रचंड बदल झाला आहे.