TVच्या पार्वतीला मिळाला रिअल लाईफ शंकर

देवो के देव महादेव फेम सोनारिका भदौरियाचा नुकताच साखरपुडा झाला. 

 सोनारिका भदौरियानं बॉयफ्रेंड विकासबरोबर आपलं नातं पुढे नेलंय.

सोनारिका आणि तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड लवकरच लग्न करणार आहेत.

सोनारिका आणि विकास यांचा साखरपुडा गोव्यात झाला. 

दोघांचा साखरपुडा 2 डिसेंबरला झाला. 

सोनारिका विकासबरोबर रोमँटिक पोझेस देताना दिसत आहे. 

साखरपुड्यासाठी सोनारिकानं लाइट पर्पल सीक्वेन्स को-ऑर्ड लेहंगा कॅरी केल होता. 

नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला. 

साखरपुड्याच्या फोटोंमध्ये विकास आणि सोनारिका प्रचंड खूश दिसत होते.