‘देवों के देव महादेव’  मालिका फेम अभिनेता मोहित रैना शनिवारी लग्न बंधनात अडकला.

नववर्षांच्या पहिल्याच दिवशी मोहित यांनी चाहत्यांना सरप्राईज दिले.

मोहितने लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर  केले आहेत.

 ‘आम्ही एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. आम्हाला आशिर्वाद द्या’ असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 

 त्याच्या फोटोवर चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

काही युजर्सनी  ‘शिव-पार्वती’ असे कमेंट बॉक्समध्ये म्हटले आहे. 

मोहितने ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे. 

 डायरीज 26\11 मध्ये देखील तो दिसला होता.

यापूर्वी मोहित अभिनेत्री मौनी रॉयला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.