'आदिपुरुष'साठी देवदत्त नागेला किती मानधन मिळालं?

जय मल्हार मालिकेतून  देवदत्त नागे घराघरात लोकप्रिय झाला होता.

 देवदत्त नागेची ही भूमिका तुफान लोकप्रिय झाली होती.

आता या अभिनेत्याने मोठी झेप घेतली आहे.

देवदत्त लवकरच आदिपुरुष या बिग बजेट सिनेमात दिसणार आहे. 

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात तो हनुमानाच्या  भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटात त्याला किती मानधन मिळालं हे जाणून घ्यायची चाहत्यांना उत्सुकता आहे.

आता या चित्रपटाच्या मानधनाबाबत त्याने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

देवदत्तने सांगितलं, 'हा चित्रपट आणि ही भूमिका हेच माझ्यासाठी मानधन आहे…हे प्रसिद्धीच्या पलीकडचं आहे.'

देवदत्तचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे.

माधुरी दीक्षितने स्वतःलाच भेट दिली इतकी महागडी कार!

Heading 3

Click Here