दलजीत कौरने मेहंदीत काढला पतीच्या लेकीचा चेहरा!

बिग बॉस'मुळे अभिनेता शालिन भनौत प्रचंड लोकप्रिय झाला होता.

 दरम्यान त्याची एक्स पत्नी-अभिनेत्री दलजित कौरसुद्धा चर्चेत आली होती.

सध्या दलजित कौर आपल्या दुसऱ्या लग्नामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

नुकतंच दलजितचा मेहंदी सोहळा पार पडला.

अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर याचे काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्रीच्या हातावर सुंदर मेहंदी काढण्यात आली आहे.

दलजितची मेहंदी खूपच खास असून तिने तिच्या मुलांचा चेहरा यात काढला आहे.

दलजित आपल्या कुटुंबासोबत दिसून येत आहे.

शिवाय या सोहळ्यात दलजितचा मुलगाही खूप खुश दिसत आहे.