माधुरी दीक्षित ते अजय देवगण... या बॉलिवूड स्टार्सनी केला धमाकेदार OTT Debut!

धक धक गर्ल माधुरी दीक्षितने नेटफ्लिक्सवरच्या 'द फेम गेम'मधून दमदार OTT Debut केला आहे.

रवीना टंडन या 90s मधल्या आणखी एका अभिनेत्रीने नेटफ्लिक्सवरच्या 'आरण्यक'मधून OTT वर झोकात एंट्री केली आहे.

बॉबी देओलच्या OTT इनिंगमध्ये 'लव्ह हॉस्टेल' आणि 'आश्रम' या दोन मोठ्या हिट्सचा समावेश आहे.

हॉटस्टारवरच्या 'रुद्रा' या स्पेशल सीरिजमधून अजय देवगणने OTT Debut केला.

'आर्या' ही सुष्मिता सेनची हॉटस्टारवरची पहिली सीरिज उत्तम आहे.

मनोज वाजपेयीचे अनेक OTT शोज लोकप्रिय ठरले. त्याचा 'द फॅमिली मॅन' हा शो विशेष गाजला.

साउथ मेगास्टार समंथा रुथ प्रभूने 'द फॅमिली मॅन'मधून OTTमध्ये एकदम प्रभावी पदार्पण केलं आहे.

OTT मध्ये सुरुवातीलाच यश मिळवणाऱ्या B-Town मधल्या दिग्गजांपैकी एक म्हणजे नवाझुद्दीन सिद्दिकी. त्याच्या 'सॅक्रेड गेम्स'ची खूप चर्चा झाली.

शाहरुख खान, शाहीद कपूर, जूही चावला, आदित्य रॉय कपूर असे अन्य अनेक बॉलिवूड स्टार्सही OTT मध्ये येण्याच्या मार्गावर आहेत.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?