लग्नानंतर वर्षभरातच आई-बाबा झाले 'हे' कलाकार
सध्या सगळीकडे आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचीच चर्चा आहे.
या दोघांना लग्नाच्या सातव्या महिन्यातच कन्यारत्न प्राप्त झाले.
अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांचे 2014 साली लग्न झाले होते. या जोडप्याने नोव्हेंबर 2015 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीला आदिराला जन्म दिला.
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर यांनी देखील त्यांच्या लग्नाच्या एका वर्षाच्या आत त्यांची मुलगी मीशा कपूरला जन्म दिला.
श्रीदेवीने 2 जून 1996 रोजी फिल्ममेकर बोनी कपूरशी लग्न केले. लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांची पहिली मुलगी जान्हवी कपूरचा जन्म झाला.
नताशा स्टॅनकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पंड्या यांनी घाईघाईत लग्न केले आणि लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुलगा अगस्त्यचे पालक झाले.
अभिनेत्री दिया मिर्झाने वैभव रेखीसोबत लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यांतच तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला.
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनीही लग्नाच्या एका वर्षातच त्यांची मुलगी मेहरला जन्म दिला.
अभिनेत्री कोंकणा सेन आणि रणबीर शौरी यांनीही लग्नापूर्वी बाळाचे नियोजन केले होते. यानंतर लगेच लग्न करून ते एका मुलाचे पालक झाले.