जान्हवी कपूर दिवाळी पार्टी लुक

लवकरच दिवाळी येत असून आत्तापासूनच सगळेच दिवाळीच्या तयारीला लागलेले दिसत आहेत. 

अनेक बॉलिवूड कलाकार दिवाळी पार्टी आयोजित करत आहेत. 

नुकतंच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने दिवाळी पार्टी होस्ट केली होती. यामध्ये जान्हवीचा ग्लॅमरस लुक पहायला मिळाला. 

या दिवाळी पार्टीसाठी जान्हवीने हिरव्या रंगाचा लेहेंगा घातला होता. 

जान्हवीचा लुक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

जान्हवीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

फोटो शेअर करत जान्हवीने लिहिले आहे की, 'मला वाटते की मला माझा नवीन आवडता रंग सापडला आहे'.

जान्हवी कपूर कायमच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते आणि तिचा हा लेटेस्ट दिवाळी लुकही नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

'मिली' चा ट्रेलर समोर आल्यापासून चाहते जान्हवीच्या अभिनयाचे खूप कौतुक करत आहेत.