बिग बॉसच्या सोना मोनाची जोडी सोशल मीडियावर हिट 

बिग बॉस मराठी 3 च्या घरातील बेस्ट फ्रेंड्स म्हणून सोनाली मीनल बाहेर पडल्या. 

बिग बॉस नंतरही दोघींची मैत्री कायम आहे. 

दोघी एकत्र येऊन धम्माल करताना दिसतात. 

सोनाली पाटील आणि मीनल शाह ही नाव आता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आपली झाली आहेत. 

या मैत्रिणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात.

दोघींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

सोना आणि मोना अशी नावं प्रेक्षकांनी या मैत्रिणींच्या जोडीला दिली आहेत. 

सोना मोना सोशल मीडियावर मजेदार रिल्स तयार करताना दिसतात. 

मैत्री कशी असावी हे दोघींनी बिग बॉस मराठीच्या घरात सर्वांना दाखवून दिलं होतं.