बिग बॉसची ट्रॉफी जिंकूनही अक्षय केळकर ट्रोल

नुकताच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा अक्षय केळकर विजेता ठरला.

अक्षय केळकरने विजेतेपद पटकावलं तर अपूर्वा नेमळेकरने दुसरं स्थान मिळवलं.

अक्षयवर सगळीकडून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पण एकीकडे त्याचं अभिनंदन होत असताना मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर त्याला ट्रोल देखील केलं जातंय.

मध्यंतरी बिग बॉसचा हा सिझन अनफेअर असल्याचा वाद उफाळून आला होता.

आता बिग बॉसच्या विजेत्याची घोषणा झाल्यानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.

सोशल मीडियावर सध्या अक्षय विरुद्ध ट्रेंड चालू झाला आहे.

तो या पर्वाच्या विजेतेपदासाठी योग्य दावेदार नव्हता असं नेटकरी म्हणतायत.

त्यामुळे एका मोठ्या वर्गाला अक्षयने विजेतेपद जिंकल्याने आनंद झाला असला तरी काही जण मात्र चांगलेच नाराज झाले आहेत.