बिग बॉस मराठी 4 मधून प्रसिद्धीस आलेला विकास सावंत.
विकासनं त्याच्या दमदार खेळानं प्रेक्षकांची मनं जिंकली.
उंचीमुळे अनेकदा विकासला अपयश पचवावं लागलं. पण त्यानं जिद्द सोडली नाही.
त्याचा ब्रेकअप देखील याच कारणानं झाला होता. त्यानं BBMमध्ये ब्रेकअपचा किस्सा सांगितला होता.
विकास म्हणाला, "अनेकदा लोक मला उंचीवरून हिणवतात".
"एका मुलीने मला उंचीमुळे नकार दिला होता".
"मी सातवीत असताना एका मुलीवर प्रेम करायचो. मी तिला माझ्या मनातील भावना सांगितल्या".
"त्यावर ती मला तुझी उंची बघ, असं म्हणाली. माझा एकतर्फी ब्रेकअप झाला होता".
"तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. मी डिप्रेस झालो होतो".
"देवाने मला असं बनवलं त्यात माझी काय चूक, असं मी सतत स्वत:ला सांगत होतो".
"अनेक वर्ष मी यामुळे लोकांपासून दूर राहिलो होतो".