शिवची आई बिग बॉसच्या घरात आली अन्...!

सध्या छोट्या पडद्यावर हिंदी बिग बॉसमध्ये मराठमोळा शिव ठाकरे धुमाकूळ घालताना दिसतोय.

सध्या छोट्या पडद्यावर हिंदी बिग बॉसमध्ये मराठमोळा शिव ठाकरे धुमाकूळ घालताना दिसतोय.

शिव ठाकरेने भारतभर हवा केली आहे.  हिंदी प्रेक्षकांनाही त्याने भुरळ घातलीये.

पण सध्या चर्चा होतीये ती शिवच्या आईची.

बिग बॉस  16 च्या घरात या आठवड्यात फॅमिली वीक रंगला.

त्यादरम्यान घरात शिवची आई आली होती.

आईला पाहून शिव भावुक झाला.

सलमानने शिवच्या आईसोबत चक्क मराठीत गप्पा मारल्या.

सलमान खानने आईसमोर शिवचं तोंडभरून कौतुक केलं आहे.