मराठी चित्रपटात झळकणार शिव ठाकरे!

'बिग बॉस 16' मराठमोळ्या शिव ठाकरेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

बिग बॉसच्या घरात असताना शिव ठाकरेला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा मिळाला होता.

या शो नंतर शिव ठाकरेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

आता शिवला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

बिग बॉस नंतर शिवकडे अनेक  प्रोजेक्ट्सच्या ऑफर येत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिव ठाकरेला एका मराठी चित्रपटाची ऑफर आली असून तो यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

2 इडियट्सच्या बॅनरखाली अमोल खैरनार या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत अशी माहिती आहे.

मात्र शिवने या बातमीची पुष्टी अजून केलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

एवढंच नाही तर लवकरच शिव 'खतरों के खिलाडी'मध्येही दिसणार असल्याची माहिती आहे.