बिग बॉस 16 मुळे सध्या शिव ठाकरे प्रचंड चर्चेत आहे.
शिव ठाकरे हा मूळचा अमरावतीचा राहणारा आहे. त्याने फारच कमी वेळेत आपली चांगली ओळख निर्माण केली आहे.
शिव ठाकरे खडतर प्रवासानंतर इथपर्यंत पोहोचला आहे.
शिवने त्याच्या वडिलांसोबत पान टपरीवर काम केलं आहे.
याशिवाय शिव ठाकरेनं दूध आणि वृत्तपत्रेदेखील विकली आहेत.
शिवला डान्स करण्याची आवड असल्यामुळे त्यानं डान्स क्लासही घेतले आहेत.
शिव मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनमध्ये सहभागी झाला होता.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा शिव विनर ठरला.
बिग मराठीचा दुसरा सीझन जिंकल्यापासून त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली.