राजच्या कावेरीचा ग्लॅमरस अंदाज!

'भाग्य दिले तु मला' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे तन्वी मुंडले.

या मालिकेतील काकू आणि बोक्या म्हणजेच राज आणि कावेरीची जोडी लोकप्रिय झाली.

या मालिकेत कावेरी एकदम साधीभोळी मुलगी दाखवली आहे.

पण खऱ्या आयुष्यात मात्र कावेरी म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले खूपच ग्लॅमरस आहे.

तन्वीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये कावेरीचा एकदम वेगळा लूक पाहायला मिळत आहे.

तन्वी नुकतीच काही कामानिमित्त दौलताबादला गेली होती. त्या प्रवासातील फोटो तिने शेअर केले आहेत.

नेहमी साडीत दिसणाऱ्या कावेरीचा हा अंदाज चाहत्यांना आवडला आहे.

तुम्हाला कावेरीचा हा लूक कसा वाटला?