'अंगुरी भाभी'नं मोडला 19 वर्षांचा संसार! 

नवऱ्याला दिला घटस्फोट 

'भाभीजी घरपर है' मालिकेच्या माध्यमातून अंगुरी भाभी अर्थातच अभिनेत्री शुभांगी अत्रे घराघरात पोहोचली.

अंगुरी भाभीला फॉलो करणारा मोठा चाहता वर्ग आहे. 

'भाभीजी घरपर है' मालिकेनं शुभांगीला नवी ओळख दिली. 

शुभांगीच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्याची नेहमीच सर्वांना उत्सुकता असते. 

शुभांगीनं तिचा तब्बल 19 वर्षांचा संसार मोडला आहे.

शुभांगीनं नवरा पियुष पुरेला घटस्फोट दिला आहे. 

 गेल्या एक वर्षापासून शुभांगी पतीपासून वेगळी राहत आहे.

लग्नाच्या तब्बल 19 वर्षानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वानांच धक्का बसला आहे.

शुभांगीने 2003 मध्ये पियुष पुरेबरोबर लग्न केलं होतं. 

पियुश हा मार्केटिंग क्षेत्रात काम करतो. दोघांना एक मुलगी आहे. 

"आम्ही नातं वाचवण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरलो", असं शुभांगीनं सांगितली. 

घटस्फोटोचं कारण देताना शुभांगी म्हणाली, "परस्पर मतभेदांमुळे आम्ही विभक्त झालो".