'Bhabhi Ji..' फेम अंगुरी भाभीपेक्षाही जास्त मानधन घेते अनिता भाभी, नव्याने झाली आहे एंट्री 

'भाभीजी घर पर हैं' हा प्रेक्षकांचा एक आवडता शो आहे.

या शोच्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

या शोमध्ये आता नव्या अनिता भाभीची एंट्री झाली आहे.

होळीच्या दिवशीच्या प्रसंगावेळी अनिता भाभीच्या भूमिकेत विदिशा श्रीवास्तवची शोमध्ये एंट्री झाली आहे.

विदिशाची एंट्री होताच तिच्या मानधनाविषयीची चर्चा सुरू झाली आहे.

विदिशा या शोसाठी भरभक्कम फीज घेत असल्याचं वृत्त आहे.

अंगूरी भाभीची भूमिका करणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे हिच्यापेक्षा विदिशा जास्त पैसे घेत आहे.

विदिशा एका एपिसोडसाठी तब्बल 55 हजार रुपये आकारते.

शुभांगी अत्रे एका एपिसोडसाठी 40 हजार रुपये घेते.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?