रकुल प्रीत आधी 'हे' कलाकार फसलेत ईडीच्या फेऱ्यात

बॉलिवूडमधील अनेक कलाकार आतापर्यंत विविध कारणांमुळे कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत.

सध्या बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला मनी लाँडरिंग प्रकरणात कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही.

ईडीने अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला तस्करी आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित चार वर्ष जुन्या ड्रग्स प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते.

सध्या सुरेश चंद्रशेखर मनी लाँडरिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची देखील ईडी चौकशी चालू आहे.

बाहुबली फेम अभिनेता राणा दग्गुबत्ती याची सुद्धा ड्रग तस्करी चौकशी प्रकरणी चौकशी झाली आहे.

गेल्यावर्षी जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात अभिनेत्री ऐश्वर्या रायची ईडी चौकशी झाली होती.

याच प्रकरणात  अभिषेक बच्चनची सुद्धा ईडी कडून चौकशी झाली होती.

सुशांत सिंग राजपूत मृत्यू नंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ड्रग्स प्रकरणात अनेकदा चौकशी झाली होती.

सध्या सुरेश चंद्रशेखर मनी लाँडरिंग प्रकरणात नोरा फतेहीची देखील ईडी चौकशी चालू आहे.