सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत अतिशा नाईकची एंट्री!
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे.
या मालिकेत मंगल म्हणजे जयदीपच्या आईची एंट्री होणार आहे.
सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक मंगल ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
सुंदरा मनामध्ये भरली नंतर आता अतिशा नाईक पुन्हा आईच्या भूमिकेत दिसणार आहेत.
जवळपास ३० वर्ष खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये घालवल्यानंतर मंगलची सुटका झालीय.
सुटका होताच जयदीपची भेट घेण्यासाठी ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झाली आहे.
३० वर्ष मुलापासून दूर राहिल्यानंतर सुटका होताच पहिल्यांदा तिने जयदीपची भेट घेण्याचं ठरवलं आहे.
मंगलच्या येण्याने कथानकात धमाकेदार वळण येणार आहे.
अतिशा नाईक यांना पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.