अथियाच्या मंगळसूत्राचं डिझाईन आहे खास! 

आणखी पाहा...!

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी नुकतंच क्रिकेटर केएलराहुल सोबत लग्नबंधनात अडकली आहे. 

चार वर्षे एकेमकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न केलं आहे. 

अथिया आणि केएल राहुलने वडील सुनील शेट्टी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्नगाठ बांधली आहे. 

या दोघांचे लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

या दोघांचा रॉयल वेडिंग लूक बराच चर्चेत आला होता. 

दरम्यान आता अथिया शेट्टीचं  मंगळसूत्र चर्चेत आलं आहे. 

अभिनेत्रीच्या मंगळसूत्राचं डिझाईन फारच सुंदर आहे. 

अगदी नाजूक असलेलं हे मंगळसूत्र अथियाला शोभून दिसत आहे. 

के एल राहुलने शेअर केलेल्या नव्या व्हिडीओमध्ये अथियाचं मंगळसूत्र दिसून येत आहे.