'आई कुठे काय करते' फेम अनघा कुणाला करतेय डेट?

'आई कुठे काय करते'मधल्या अरुंधतीला आत्मविश्वास जागवण्यास मदत करणारी मैत्रीण आणि आता तिची सून झालेली अनघा हिच्या रोलला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

अनघाचा रोल साकारणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. साताऱ्यातलं वाई हे अश्विनीचं मूळ गाव. तिचा जन्म 1990 सालचा.

कॉमर्सची पदवी घेतल्यानंतर अश्विनीने हॉटेल मॅनेजमेंटचंही शिक्षण घेतलं आहे. दरम्यान, ती गावातल्या जत्रेतल्या नाटकांमध्ये अभिनय करत असे.

शिक्षणानंतर ती अभिनयाकडे वळली. 2014 साली 'झी मराठी'वरच्या 'अस्मिता' सीरियलमध्ये तिने डिटेक्टिव्ह अस्मिताच्या सहायिकेचा रोल केला.

त्यानंतर अश्विनीने 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत केलेली शिवकन्या राणूअक्काराजेंची भूमिकाही गाजली.

'झी मराठी'वरच्याच 'चला हवा येऊ द्या - सेलेब्रिटी पॅटर्न' या शोमध्येही अश्विनीने काम केलं होतं.

'गावाकडच्या गोष्टी' या वेबसीरिजमध्येही अश्विनी झळकली असून, त्या भूमिकेसाठी तिला 2018 साली प्रेरणा पुरस्कारही मिळाला होता.

दरम्यानच्या काळात टपाल, बॉइज अशा काही मराठी सिनेमांमध्येही अश्विनी महांगडेने अभिनय केला.

अश्विनीने मोरया प्रॉडक्शन हाउस सुरू केलं असून, त्या माध्यमातून 'माहवारी' ही वेबसीरिज तयार करण्यात आली आहे.

अश्विनी सामाजिक कार्यकर्तीदेखील आहे. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान ही NGO तिने स्थापन केली असून, त्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जातात.

निलेश जगदाळे या तरुणाला अश्विनी डेट करत असून, अलीकडेच तिने सोशल मीडियावर त्याच्यासोबतचा फोटो पोस्ट केला होता.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?