सायली संजीवला अशोक मामांनी दिलं 'हे' खास गिफ्ट!
सायली संजीव ही महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे.
निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांनी अभिनेत्री सायली संजीवला आपली मुलगी मानलं आहे.
नुकतीच अशोक सराफ आणि निवेदिता यांनी आपल्या लाडक्या लेकीला एक खास भेट दिली.
ती भेट सायलीला देखील खूप आवडली आहे.
सायलीला अशोक मामांनी खास निळ्या रंगाची पैठणी भेट म्हणून दिली आहे.
सायलीने झी चित्र गौरव पुरस्कार 2023 साठी खास निळ्या रंगाची साडी नेसली होती.
अशोक मामांनी दिलेल्या या पैठणीत सायली खूपच सुंदर दिसत आहे.
बापानं आपल्या लेकीला खास मायेची ऊब म्हणून साडी भेट दिली आहे.
सायलीसाठी ही भेट खूपच खास आहे.