रस्त्यावर सापडलेली अर्पिता अशी झाली सलमानची लकी चार्म!
सलमान खान बहीण अर्पिता खानवर सर्वात जास्त प्रेम करतो.
सलमान अर्पिताला त्याचा लकी चार्म मानतो.
अर्पिता ही सलमान खानची खरी बहीण नसून तिला सलीम खान यांनी दत्तक घेतले होते.
सलीम खान रोज मॉर्निंग वॉकसाठी जात असत तेव्हा एक मुलगी रस्त्यावर रडताना दिसली.
हे पाहून स्लिम खान यांचं मन कळवळलं आणि त्यांनी त्या मुलीला थेट घरी आणलं.
हेलन आणि सलीम खान यांनी दत्तक घेतलेल्या या मुलीचं नाव अर्पिता असं ठेवण्यात आलं.
आज अर्पिता ही केवळ सलमान खानचीच नाही तर संपूर्ण खान कुटुंबाची जीव कि प्राण आहे.
खान कुटुंबानं मोठ्या मनाने अर्पिताला आपल्यात सामावून घेतलं.
आज अर्पिताने आयुष शर्माशी लग्न केलं असून दोघांना दोन मुलं आहेत.