वयाच्या 50 व्या वर्षी बाबा झाला अभिनेता

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अभिनेता अपूर्व अग्निहोत्री आणि अभिनेत्री शिल्पा सकलानी.

अपूर्व आणि शिल्पाच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. 

बाबा झाल्याविषयी अपूर्वने पोस्ट शेअर करत माहिती दिली. 

लग्नाच्या 18 वर्षानंतर अपूर्व आणि शिल्पा आई बाबा झाले आहेत. 

विशेष म्हणजे आज अपूर्वचा वाढदिवस असून त्याला हे वाढदिवसाचं गिफ्ट मिळालं आहे. 

अपूर्व आणि शिल्पाने मुलीचं नाव ईशानी ठेवलं आहे. 

अपूर्व 50 व्या वर्षी बाबा झाला आहे. तर शिल्पा 40 व्या वर्षी आई.

दोघांवरही सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

बाळाची झलक पाहून त्यांचे चाहतेही खूप आनंदी आहेत.