दया बेन ते गोपी बहु ! 

+ + +

डेलीसोपच्या सुना किती शिकल्यात माहितीय?

‘साथ निभाना साथिया’ मालिकेनं ‘गोपी बहू’चं काम करणाऱ्या जिया मानेकला खूप लोकप्रियता मिळाली.

गोपी बहू प्रत्यक्षात पदवीधर आहे. मार्केटिंग क्षेत्रात तिनं पदवी मिळवली आहे.

जिया मानेकनं मालिका सोडल्यानंतर गोपी बहूची भूमिका साकारणारी देवोलिना भट्टाचार्जीनं साकारली.

देवोलिना भट्टाचार्जी हिनेही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड टेक्नॉलॉजीमधून पदवी घेतली आहे.

अनुपमाची भूमिका करणाऱ्या रूपाली गांगुलीनं खऱ्या आयुष्यात हॉटेल मॅनेजमेंट आणि थिएटरमध्ये पदवी मिळवली आहे.

तारक मेहता का उल्ट चष्मा फेम दयाबेन सर्वांची लाडकी आहे.

दयाबेनची भूमिका करणारी दिशा वकानी हिनं खऱ्या आयुष्यात गुजरात कॉलेजमधून नाट्य विषयात पदवी घेतली आहे.

चुकीचं इंग्रजी बोलून सगळ्यांना हसवणारी ‘अंगूरी भाभी’सुद्धा उच्चशिक्षित आहे.

अंगुरी भाभी फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे हिनं एमबीए केलं आहे.

‘छोटी बहू’ मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेल्या रुबिना दिलैक हिनं इंग्रजीमध्ये पदवी मिळवली आहे. 

‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ फेम अभिनेत्री रतन राजपूतही खऱ्या आयुष्यात उच्चशिक्षित आहे.