अनंत अंबानी आणि राधिकाची लव्हस्टोरी

मुकेश अंबानीचा धाकटा मुलगा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 

नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा पार पडला.

राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात अनंत आणि राधिकाचा हा खास कार्यक्रम झाला.

अनंत आणि राधिकाची लव्हस्टोरीही खूप खास आहे. 

अनंत आणि राधिका लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. 

2018 मध्ये दोघांचा एकत्र फोटो व्हायरल झाला होता. 

दोघांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं. 

राधिका मर्चंट अंबानी कुटुंबियांच्या प्रत्येक कार्यक्रमातही सहभागी झालेली पहायला मिळाली.

2019 मध्ये अनंत आणि राधिकाने गुपचुप साखरपुडा केल्याची चर्चा होती.