अभिनेत्री अमृता सिंह आज तिचा 65वा वाढदिवस साजरा करतेय.
अमृता आणि सैफ अली खान यांची जोडी एकेकाळी खूप चर्चेत होती.
प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे या दोघांनी दाखवून दिलं होतं. अमृता सिंहनं 13 वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानबरोबर केलं होतं.
दोघांचं लग्न झालं तेव्हा अमृता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री होती. तर सैफ स्ट्रगलर अभिनेता.
अभिनय करिअरमध्ये अमृतानं अनेक हिट सिनेमे दिले. अशातच तिच्या लव्ह लाईफमुळे ती चर्चेत आली.
अमृता आणि सैफनं 1991मध्ये सीक्रेट वेडिंग केलं होतं. लग्नानंतर दोघांना सारा आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुलं झाली.
अमृता आणि सैफमध्ये 12-13 वर्षांचं अंतर असल्यानं त्याचे आई-वडील त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते.
इब्राहिमच्या जन्मानंतर अमृता-सैफच्या नात्यात दुरावा आला असं म्हटलं जातं.
सैफचं नाव एका विदेशी मॉडेलबरोबर जोडलं गेलं होतं. त्यामुळेच अमृता-सैफ यांचं घटस्फोट झाला.
2004मध्ये अमृता-सैफ यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर आजपर्यंत अमृता सिंगल आहे.
तर सैफनं अभिनेत्री करीना कपूरबरोबर लग्न केलं. दोघे 5 वर्ष डेटिंग करत होते.
सैफ आणि अमृताच्या लग्नात करीना कपूर फ्रॉकमध्ये आली होती. दोघांच्या रिसेप्शनमधील फोटो देखील पाहायला मिळतो.
आता सैफ-करीनाला तैमूर आणि जेह अशी दोन मुलं आहेत.