अमिताभ यांचे फोटो आणि आवाज वापरण्यावर बंदी

अभिनेते अमिताभ बच्चन गेली अनेक दशके बॉलिवूडवर राज्य करत आहेत. 

बॉलिवूडचे बिग बी कायम चर्चेत असतात. 

सोशल मीडियावर रोज त्यांच्याविषयी काही ना काही पहायला मिळतं. 

अनेकजण त्यांचे फोटो आणि आवाज सतत वापरत असलेले दिसून येतं.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. 

बिग बींनी त्यांची प्रतिमा, व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये, आवाज आणि नाव सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

न्यायालयाने यावर सुनावणी करताना सांगितले, अमिताभ यांच्या परवानगीशिवाय त्यांचे चित्र आणि आवाज वापरता येणार नाही.

 अमिताभ यांची परवानगी न घेता त्यांच्याविषयी काहीही वापरले तर त्याविरोधात कारवाई होई शकते. 

अमिताभ यांच्या या निर्णयामुळे सध्या सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.