आमिरच्या लेकाला कधी पाहिलंय का?
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणजेच आमिर खानने 'लाल सिंग चड्ढा' नंतर बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे.
पण आमिरचा मुलगा जुनैद खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
यशराज बॅनरच्या 'महाराजा' या चित्रपटातून तो आपल्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाला सुरुवात करणार आहे.
साऊथच्या सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी जुनैद खानला साईन केल्याचे बोलले जात आहे.
तमिळचा हिट चित्रपट 'लव्ह टुडे'च्या हिंदी रिमेकमध्ये जुनैद दिसणार आहे.
याआधी जुनैद महाराजा या चित्रपटात दिसणार असल्याची माहिती होती.
जुनैद खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आमिर खानचे चाहते आतुर झाले आहेत.
जुनैद हा आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताचा मुलगा आहे.
आमिरचा लेक सुद्धा वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये हिट ठरणार का ते पाहणं महत्वाचं आहे.