कोण आहे साऊथ स्टार वरुण तेजची होणारी बायको?
साऊथ इंडस्ट्रीत अल्लू-कोनिडेल कुटुंबाचा दबदबा आहे.
या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने सुपरस्टार म्हणून नाव कमावलं आहे.
चिरंजीवीपासून अल्लू अर्जुन, प्रभास ते वरुण तेज असे अनेक कलाकार या कुटुंबात आहेत.
चिरंजीवी आणि पवन कल्याण यांचा पुतण्या वरुण तेजबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
वरुण तेज येत्या ९ तारखेला साखरपुडा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
वरुण तेज गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री लावण्या त्रिपाठीला डेट करत आहे.
वरुणसारखंच लावण्यासुद्धा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकली आहे.
वरुण साई पल्लवीसोबतच्या 'फिदा' सिनेमामुळे लोकप्रिय ठरला होता.
लावण्या आणि वरुण गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.