बिग बॉस हिंदीमुळे शिव ठाकरे प्रचंड चर्चेत आहे. इतकंच नव्हे तर तो सतत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतो.
शिवने एमटीव्हीवरील 'रोडीज' याच लोकप्रिय रिऍलिटी शोमधून टीव्हीवर पदार्पण केलं होतं. या शोमुळेसुद्धा तो चांगलाच प्रसिद्धीस आला होता.
शिव ठाकरेने रोडीजच्या ऑडिशनमध्ये सांगितलं होतं की, 'त्याचे वडील एक पान दुकान चालवत होते. तो आपल्या वडिलांसोबत या दुकानात काम करायचा.
इतकंच नव्हे तर घर चालवण्यासाठी त्याच्या बहिणीने आणि त्याने वृत्तपत्रे आणि दूधदेखील विकलं आहे.
त्यानंतर शिवने डान्स क्लास घेण्यासही सुरुवात केली. यामध्ये त्याला 10 ते 22 हजारांपर्यंत पैसे मिळत असत.
शिव ठाकरे हा मूळचा अमरावतीचा राहणारा आहे. त्याने फारच कमी वेळेत आपली चांगली ओळख निर्माण केली आहे.
रोडीजनंतर शिव मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनमध्ये सहभागी झाला होता.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा शिव विनर ठरला.
आता तो बिग बॉस हिंदीमध्येही विनर ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.