करण जोहरच्या आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची सध्या जोरदार चर्चा आहे.
या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
नुकतीच दोघांनी मनीष मल्होत्राच्या रॅम्प वॉक शोमध्ये हजेरी लावली होती.
या 'ब्रायडल कॉउचर शो' मधील दोघांचे व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.
रणवीर आणि आलिया भट्टच्या रॅम्प वॉकवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
या शोमध्ये रणवीर सिंहने क्रीम रंगाची शेरवानी, तर आलिया भट्टने राखाडी आणि सिल्व्हर रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
हा रॅम्प वॉक करताना आलिया भट्ट ड्रेस सावरत अतिशय काळजीपूर्वक चालताना दिसली.
आलिया भट्टचे रॅम्प वॉक करतानाचे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्री ट्रोल केले आहे.
काहींनी तिला दीपिकासोबत तुलना करत तिची कॉपी केल्याचं म्हटले आहे.