आलिया पोटात असताना आईला लागलेले सिगरेटचे डोहाळे!

अभिनेत्री आलिया भट्ट  दिवसांपूर्वीच आई झाली आहे.

पण आलिया भट्ट पोटात असताना तिची आई जे करायची त्याची आजही चर्चा होते.

आलिया पोटात असताना तिची आई म्हणजेच अभिनेत्री सोनी राझदान सिगरेट ओढायची.

याविषयी स्वतः आलियाच्या आईनंच खुलासा केला होता.

आलियाची आई सोनी राझदान एकेकाळची आघाडीची अभिनेत्री होती. तिचा गुमराह सिनेमा विशेष गाजला.

 गुमराहच्या शुटींगवेळी सोनी राझदान प्रेग्नंट होती.

या सिनेमाची आठवण सांगताना त्या म्हणाल्या होत्या कि, 'शुटींगवेळी मी प्रेग्नंट होते पण मला माहिती नव्हतं.'

 'मी शुटींग संपल्यावर भरपूर सिगरेट ओढायचे' असं ट्विट सोनी राझदान यांनी 2019मध्ये केलं होतं.

आलियाच्या आईने केलेला हा खुलासा ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला होता.