एकेकाळी आलियाला सगळेच समजायचे बिनडोक; हे होतं कारण!
आलिया भट्ट चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
आपल्या दमदार अभिनयामुळे आलियाने फार कमी वेळात चित्रपट विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पण करिअरच्या सुरुवातीच्या काळात आलिया भट्ट ट्रॉलर्सच्या नेहमी निशाण्यावर असायची.
2013 मध्ये आलिया भट करण जोहरच्या प्रसिद्ध शो कॉफी विथ करण मध्ये आली होती.
त्यावेळी तिला भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर आलियाने ‘पृथ्वीराज चौहान’ असे उत्तर दिले. मग काय, तिच्या या उत्तरामुळे तिची खूप खिल्ली उडवली गेली.
सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल करण्यात आलं. तिच्यावर खूप मिम्स देखील बनवले गेले.
करिअरच्या सुरुवातीच्या काळात अशा ट्रोलिंगचा सामना करणं हे आव्हानापेक्षा कमी नव्हतं.
पण त्यावर मात करत आज आलिया एक यशस्वी अभिनेत्रींनपैकी एक आहे.