अक्षय आणि ट्विंकल खन्नाची हटके लव्हस्टोरी

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणून ओळखलं जाणारं कपल म्हणजे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना. 

अक्षय आणि ट्विंकलची लव्हस्टोरी खूप हटके आहे. 

17  जानेवारी 2001 रोजी अक्षय आणि ट्विंकल लग्नबंधनात अडकले. 

अक्षय आणि ट्विंकल यांची भेट फिल्मफेअरच्या फोटोशूटदरम्यान झाली होती. 

ट्विंकलला पाहता अक्षय भारावून गेला होता. 

इंटरनॅशनल खिलाडी चित्रपटावेळी दोघांची जवळीक वाढली. 

ट्विंकलची आई डिंपल या नात्यासाठी तयार नव्हती. तिला अक्षय कुमार गे असल्याचं वाटायचं. 

डिंपलने लग्नासाठी एक अट ठेवली. लग्नाआधी दोघांना एक वर्ष एकत्र रहावं लागेल आणि नंतर लग्न. 

ट्विंकल आणि अक्षय यांनी एक वर्ष एकत्र राहिल्यावर 2001 मध्ये लग्न केलं.