अभिनेता अक्षय केळकरने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचं विजेतेपद जिंकलं.
अक्षयने बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर त्याचं खूप कौतुक झालं.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिग बॉसच्या प्रवासाबद्दल अक्षयने बरेच खुलासे केले आहेत.
आता त्याने बिग बॉस आणि महेश मांजरेकर यांच्याबद्दल कुणालाही माहीत नसलेला किस्सा शेअर केला आहे.
बिग बॉसच्या घरात अक्षय केळकरला होस्ट महेश मांजरेकर यांच्याकडून बराच ओरडा बसला
याविषयी तो म्हणाला, 'मांजरेकर सर जेव्हा मला खूप ओरडायचे तेव्हा कौतुक देखील करायचे.'
अक्षयला महेश सर दर शनिवारी गुपचूप मोदक पाठवायचे. जे टीव्हीवर दाखवण्यात आलं नाही.
अक्षय म्हणाला 'त्यांचं माझ्यावर एक वैयक्तिक प्रेम होतं. भले ते माझ्यावर कितीही चिडले तरीही.'
अशा प्रकारे अक्षयने बिग बॉसच्या घरातील एक मोठं गुपित सर्वांसमोर सांगितलं आहे.