शिवरायांच्या रुपातील अक्षय प्रेक्षकांना पटेना! 

'वेडात मराठे वीर दौडले सात' या नव्या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली. 

सिनेमात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 

मुख्यमंत्री आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत  सिनेमाची घोषणा करण्यात आली. 

महाराजांच्या भूमिकेतील अक्षयचा पहिला लुक समोर आला आहे. 

पण अक्षय कुमार महाराजांची भूमिका साकारणार हे प्रेक्षकांना काही पटलेलं नाही. 

'असा शिवाजी आम्हाला पाहायचा नाही', असं अनेकांनी म्हटलं आहे. 

अनेकांनी अक्षयच्या जुन्या सिनेमांचे दाखले देत मिम्स क्रिएट केलेत. 

अक्षय म्हणाला, 'मला राज ठाकरेंमुळे ही भूमिका मिळाली. तू ही भूमिका करायला हवी', असं ते मला म्हणाले.

'महाराजांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे' असं अक्षय म्हणाला. 

'भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. सगळी शक्ती मी यासाठी खर्च करेन', असंही अक्षय म्हणाला.

अक्षय कुमारला महाराजांच्या भूमिकेत पाहायला तुम्हाला आवडेल का?