तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारणार हा अभिनेता!

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टकातील पाचव्या सिनेमाची घोषणा केली होती.
त्यांचा 'सुभेदार'हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तेव्हापासून तानाजी मालुसरे यांची भूमिका कोण साकारणार ही उत्सुकता चाहत्यांना होती.
आता या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे. या चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज झालं आहे.
अभिनेते अजय पुरकर हे सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत झळकणार आहेत.
हातात तलवार अन नजरेत धगधगणारी आग असा अजय पुरकर यांचा दमदार लूक दिसत आहे.
 अजय पुरकर यांनी याआधी बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका अजरामर करून ठेवली होती.
पावनखिंड या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला होता.
आता त्यांना पुन्हा तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.