अभिनेत्री वैशाली टक्करची आत्महत्या

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री वैशाली टक्करने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

अभिनेत्रीने आपल्या इंदोरच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. 

 पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांना वैशालीच्या मृतदेहा शेजारी सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे.

30 वर्षीय अभिनेत्रीने 'ससुराल सिमर का', 'ये रिश्ता क्या कहलाता है' सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

 ती बिग बॉसमध्ये देखील सहभागी होती. 

वैशाली टक्कर आत्महत्येप्रकरणी तेजाजी नगर पोलीस ठाणे तपास करत आहेत.

वैशाली टक्करच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

तिच्या जाण्यानं सगळीकडे शोककळा पसरली आहे. 

वैशालीने हे टोकाचं पाऊल का उचलले? हा प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात आहे.