ऋतुराजविषयी स्पष्टच बोलली सायली संजीव

गेल्या बऱ्याच दिवसांपासून सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाडच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. 

सायलीच्या पोस्टवर ऋतुराजने कमेंट केल्यापासून या चर्चांना उधाण आलं होतं. 

अफेअरच्या चर्चांवर आता सायलीने अखेर मौन सोडलं आहे. 

एका मुलाखतीत सायलीने ऋतुराजसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं. 

सायली म्हणाली, ऋतुराजसोबत नाव जोडलं गेल्यापासून आमच्या मैत्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे. 

 नात्याबद्दलच्या चर्चा रंगल्यामुळे त्याचा परिणाम आमच्या मैत्रीवर झाला असल्याचं सायली म्हणाली.

आता आमच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे, असं सायलीने सांगितलं. 

आम्ही आधीप्रमाणे मित्रासारखं बोलू शकत नाही, असंही सायली म्हणाली. 

सायलीच्या स्पष्टीकरणामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.