स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारुन अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली.

प्राजक्ता सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. सोशल मिडीयावर तिचे काही फोटो चर्चेत आहेत. 

प्राजक्ताने साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या व श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतलं.

जेजुरी गडावरचे हे सुंदर फोटो प्राजक्ताने शेयर केले. 

महत्त्वाचं म्हणजे प्राजक्ताने खंडेरायाची 42 किलो वजनाची खंडा तलवार उचलली आणि सदानंदाचा येळकोट… येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला. 

यावेळी तिने गडावरचा भंडारासुध्दा उधळला. 

 प्राजक्ताच्या या पोस्टवर मराठमोळी वाघिण, जिजाबाईंची लेक अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी दिल्या.

गतवर्षीही प्राजक्ताने खंडेरायाच्या जेजुरीचं दर्शन घेत, 42 किलोंची खंडा तलवार लिलया उचलली होती.

येसूबाईच्या भूमिकेसोबत तिने नांदा सौख्यभरे, संत तुकाराम या मालिकेत काम केलेय.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत होती. पण काही वादांमुळे तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले.

प्राजक्ताला नृत्याची देखील आवड आहे.