मुक्ता बर्वेला चाहत्याकडून मिळाली अनमोल भेट!
मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे.
मुक्ताने आजपर्यंत विविध भूमिका साकारत चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
नाटक, चित्रपट असो वा मालिका तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षक भारावून जातात.
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष कार्यरत असणाऱ्या मुक्ताचे चाहतेही मोठ्या प्रमाणात आहेत.
आता मुक्ताला चाहत्यांकडून एक अनोखी भेट मिळाली आहे.
मुक्ताला चाहत्यांनी चक्क तिचंच एक सुंदर पोर्ट्रेट भेट म्हणून दिलं आहे.
हे पोर्ट्रेट पाहून मुक्ता फारच भावूक झाली. खरंतर या तिघांना ती बरेच वर्षं ओळखत असल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे.
आपल्या या चाहत्यांबरोबर आणि त्या सुंदर पोर्ट्रेटबरोबर एक फोटो शेअर करत मुक्ताने तिच्या भावना तिच्या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.
स्वप्ना ,देवप्रसाद आणि हेरंब यांनी मुक्ताचं हे पोट्रेट खास भोपाळ च्या एका फार मोठ्या कलाकाराकडून ते बनवून घेतलंय.