जान्हवी कपूरने खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

 बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. 

जान्हवी नेहमीच तिच्या नवनवीन फॅशनने चाहत्यांना भुरळ घालते.

अनेकवेळा जान्हवी मित्र-मैत्रिणींसोबतही हॅगआऊट करताना दिसते. 

जान्हवी कपूर सध्या तिचा चित्रपट 'मिली'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट आज प्रदर्शित झाला.

चित्रपट प्रदर्शित होताच जान्हवीने नवं आलिशान घर खरेदी केलं आहे. 

जान्हवीने वांद्रे येथे 65 कोटींचे डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केलंय. 

8,669 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या घराचे कार्पेट क्षेत्र 6421 चौरस फूट आहे.

जान्हवीला तिच्या नव्या घरावरुन ट्रोल केलं जात आहे. 

'तुझ्या पैशानं घेतलं घर का वडिलांच्या', असा प्रकारच्या कमेंट ट्रोलर्स करत आहेत.