'दंगल' चित्रपटामुळे अभिनेत्री फातिमा सना शेख प्रकाश झोतात आली.
दंगल चित्रपटानंतर फातिमाला 'दंगल गर्ल' असं नाव पडलं आहे.
फातिमा एका गंभीर आजाराशी झुंज देत असल्याचं समोर आलंय.
फातिमाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आजाराविषयी माहिती दिली.
फातिमाला एपिलेप्सी हा आजार झाला आहे.
एपिलेप्सी आजार न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये रुग्णाला वारंवार झटके येतात.
फातिमाला 'दंगल' चित्रपटाच्या सेटवर एपिलेप्सी झाल्याचं कळालं.
दंगलच्या शूटिंगदरम्यान तिला पॅरालायटिक स्ट्रोक आला होता.
फातिमा आता आजारासोबत जगायला, काम करायला आणि लढायला शिकली आहे.