प्रेमासाठी दीपिका कक्करने स्वीकारला इस्लाम धर्म!

अभिनेत्री दीपिका कक्कर आपल्या  वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते.

दीपिका कक्करने लग्न झाल्यानंतर आपला धर्म बदलला आहे.

अभिनेत्री दीपिका कक्करने 2018 मध्ये शोएब इब्राहिमसोबत लग्न केलं.

दोघांनीही 'ससुराल सीमर का' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. यादरम्यान त्यांच्यात प्रेम झालं.

दीपिकाचा मूळ धर्म हिंदू आहे.

 पण तिने शोएबसोबत लग्न करण्याअगोदरच धर्म बदलून मुस्लीम केला.

इस्लाम स्वीकारल्यानंतर मी प्रचंड आनंदात असून, स्वत:च्याच आनंदासाठी आपण हे पाऊल उचलल्याचं दीपिकानं म्हटलं होतं.

दिपिका सोशल मीडिया आणि युट्युबरही खूप सक्रिय असते.

आजही दीपिकाला धर्म बदलावरून अनेकवेळा ट्रोल केलं जातं.