चारु असोपा करतेय टीव्हीवर पुनरागमन
अभिनेत्री चारु असोपा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री चारु अडचणींचा सामना करत आहे.
चारुच्या वैवाहिक जीवनात चढ-उतार सुरु असून ती नवरा राजीव सेनपासून विभक्त होणार आहेत.
घटस्फोटामुळे चर्चेत असणारी चारु आता टेलिव्हिजनवर पुनरागमन करणार आहे.
ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत चारुने तिच्या पुनरागमनाविषयी सांगितलं.
पुन्हा टीव्हीवर काम करण्यासाठी चारु खूप उत्सुक आहेत.
चारु असोपाचे चाहतेही तिला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
चारुला मात्र तिची मुलही जियानाविषयी चिंता वाटत आहे.
शूटिंगला जायचं म्हटल्यावर जियानापासून दूर रहावं लागेल.